ज्या मराठी शाळेतुन मराठी माणूस घडतो त्याच मराठा मंडळ शाळेतील संस्थापक बेळगावी असा उल्लेख करत आहेत. त्यासाठी त्या शाळेतील मराठी शिकलेले बांधव शाळेच्या ७५ वर्षा निमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याच्यावर बहिष्कार टाकावा हिच आमची इच्छा. शाळेत शिकणाऱ्या बांधवानी सुद्धा बहिष्कार टाकावा.
ही मागणी आहे, मराठा मंडळ संस्थेच्या शाळांतून शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांची. त्यांनी ही मागणी एक पत्रक प्रसिद्ध करून जाहीरपणे केली आहे.
सर्व मराठी माणूस व आजी माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास जाऊ नये, तर बहिष्कार टाकावा अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.
मराठा मंडळ ही संस्था मराठी माणसांनी तयार केलेली आणि सुरवातीच्या काळात आर्थिक मदत देऊन उभी केलेली आहे.
मात्र या संस्थेने आपल्या अमृत महोत्सव कार्यक्रमाची फलकबाजी करताना बेळगाव असे न लिहिता बेळगावी असा उल्लेख केला आहे. बेळगावी लिहिण्यास बेळगाव मधील मराठी नागरिकांचा विरोध आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही याचा संताप आला असून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राधेश शहापुरकर, प्रशांत बराके, निखिल बहाले, अक्षय शहापुरकर,राहुल चव्हाण, सूरज कणबरकर, विशाल बराके,निशांत मेनसे, ज्योतेश लोहार, सुधीर पाटील,राहुल बराके, निकेश पवार, शुभम किल्लेकर,प्रकाश कामांनाचे,सतीश हकले, किशन कडोलकर या विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.