गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य फलक लावला म्हणून मराठी आणि कन्नड भाषिकात तेढ निर्माण केली असा आरोप करत काकती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मणणूर येथील आठ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.जे एम एफ सी चतुर्थ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचा आदेश बजावला आहे.
या प्रकरणी काकती पोलिसांनी मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहित १४३,१४७,१५३-अ सह कलम १४९ तसेच कलम ३ प्रमाणे खुल्या जागेचा दुरूपयोग करणे कायदा १५१,१८१ चा भंग असा गून्हा अप्पूगोळ यांनी दाखल केला होता.सदर खटला ४थे-जे,एम,एफ,सी न्यायालय सूरु होता.यात सरकारतर्फे १५ जणाची साक्ष नोंदवली.पण सदर गुन्हा शाबित न झाल्याने मा.न्यायालयाने आज शनिवार दिं २९/१२/२०१८ रोजी सर्व समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.सर्व समिती कार्यकर्त्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे यांनी सक्षमपणे आपली बाजू मांडत महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणातील पहिला खटला जिंकला.
दि २८/७/२०१४ रोजी कल्लाप्पा आप्पूगोळ यांनी सुधीर मारुती काकतकर,राजू म्हात्रू चौगुले, राजू बाळू होनगेकर,मारुती बाळू होनगेकर, मधू भैरु चौगुले, सुनील कल्लाप्पा सांबरेकर, शिवाजी बाळाप्पा कदम,संजू महादेव मंडोळकर,मारुती गूंडू होनगेकर,अरुण सोमान्ना कदम या सर्वांनी मारुती गल्ली मण्णूर येथील सरकारी फलकावर महाराष्ट्र राज्य मणणूर असा फलक लावला होता.