धर्मप्रसार करतो या कारणावरून कोवाड मध्ये सशस्त्र तरूणांचा हल्ला. हल्यात महिला पुरूषासह बारा ते तेरा जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीच वातावरण तयार झालं आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, रविवारच्या दिवशी कोवाड मध्ये मूळचा चव्हाण नामक व्यक्ती धर्मप्रसार करतो. या दिवशी तो भविष्य सांगणे, आजार बरे करण्यासाठी गायन अशी कामे करून आपल्या धर्माकडे इतरांना आकर्षित करतो अशी नागरीकात चर्चा होती. गेली सहा सात वर्षे हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.
आज रविवार असल्याने जवळपास चाळीस महिला, पुरूष आपला आजार बरा करून घेण्यासाठी कोवाड मधील मूळचा चव्हाण सध्याचा पास्कल नामक व्यक्तीकडे आल्या होत्या. साधारण साडेअकराच्या सुमारास दहा ते पंधरा तरूण अचानक सदर ठिकाणी येऊन तलवारीने “त्या” धर्मप्रसारकावर हल्ला केला.
यावेळी तिथे असलेल्या अनेक पुरूष आणि महिलावरही हा हल्ला झाला असून गोंधळ उडाल्यामुळे अनेकजण जखमी झाले. हा हल्ला झाल्यानंतर त्या तरूणांनी कुदनूर , तळगुळी, दिंडलकोप मार्गे कर्नाटक हद्दीत पलायन केले. जाताना दोन गाड्यांवरही हल्ला केला आहे. मात्र , हे हल्लेखोर कोण होते याची ओळख अजून पटलेली नाही.
कोवाड पोलिस पोलिस या घटनेची माहिती घेतली असून, तपास पथके कर्नाटकच्या दिशेने रवाना केली आहेत.दरम्यान ही घटना घडल्यानंतर अफवांचे लोण पसरले आहे.
*दोन वर्षापूर्वीच्या घटनेची चर्चा*
दोन वर्षापूर्वी मौजे कार्वे मध्येही असच काम करणाऱ्या व्यक्तीला सुमारे दोनशेहून अधिक तरूणांनी त्याला चोप देऊन, तो आजार बरा करतो म्हणून जी जागा होती तेथील साहित्याची मोडतोड केली होती. त्यामुळे, या घटनेची चर्चा होत होती.