कर्नाटक काँग्रेस मध्ये काहीच बरोबर चाललेले नाही. काँग्रेस मधील आमदारांचा एक गट नाराज आणि असंतुष्ट आहे. पक्ष नेतृत्व त्यांना समाधानी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे.
माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी हे स्पष्ट केले आहे. नाराज गट २५ ते ३० इतका मोठा नाही पण प्रबळ ६ ते ७ जण असून ते खुश नाहीत. ही नाराजी संयुक्त युती सरकार आणि काँग्रेस नेतृत्वावर आहे असेही जारकीहोळी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
विरोधी पक्ष दुरावा वाढवण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून करत आहे. काँग्रेस मधील नाराज आमदारांना खरेदी करून आपले सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न आहेत पण आम्ही आमच्या आमदारांची नाराजी दूर करण्यास समर्थ असून विरोधी पक्षाने हे स्वप्न पाहू नये असेही सतीश जारकीहोळी म्हणाले आहेत.
आपण स्वतः काँग्रेसला रामराम करण्याच्या अजिबात मनस्थितीत नाही. माझे बोलणे राज्य अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांच्यासोबत झाले आहे. आमचे पक्षश्रेष्टी पूर्णपणे आमच्या बाजूने आहेत. असे सांगून पक्ष बदलावरून सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी विराम दिला आहे.
मी मंत्री पदापेक्षा वैयक्तिक शक्तिशाली आहे तरीही एक जिल्हा स्तरीय मंत्रिपद मी मागितले आहे. शांतपणे वाट बघा सगळे ठीक होईल आणि अफवा सुद्धा दूर होतील असे सतीश जारकीहोळी म्हणाले.