कुणी तरी पाठलाग करतंय रात्रीच्या अंधारात घरातील विहिरीत पडलेल्या पर प्रांतीय युवकास अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.
सागर सम्बली सैनी वय 28 मूळ रा. बिनदावरी जिल्हा देवार उत्तरप्रदेश असे विहिरीतून बाहेर काढलेल्या युवकांचे नाव आहे.
या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार आनंद नगर वडगांव येथील मुंगारी यांच्या घरा समोर असलेल्या लहान विहिरीत हा युवक पडला होता रात्री कुणी तरी त्याला मारहाण करायला पाठलाग करत असल्याने घाबरून पडला असल्याची माहिती त्याने स्वतः पोलिसांना दिली.
पहाटेच्या वेळी विहिरीतून आवाज ऐकू येऊ लागल्याने मुंगारी यांनी विहिरीत पाहिले तर सदर युवक पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले लागलीच त्यांनी शहापूर पोलिसांना संपर्क साधला त्यानंतर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.अग्निशामक अधिकारी टक्केकर आदी सहकाऱ्यांनी त्याला जिवंत सुखरूप बाहेर काढले.