कर्नाटक राज्य स्थापन झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यासोबत संपूर्ण उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम म्हणून यंदा होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाचा मुद्दा जोर धरणार आहे. अधिवेशन काळात उत्तर कर्नाटक विकासाच्या मागणीवरून भाजप आमदारांचे आंदोलन जोर घेण्याची शक्यता असून याचा फटका अधिवेशनाला बसू शकतो.
ऊस उत्पादकांच्या आंदोलनास शह देणारे मोठे आंदोलन उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यावर पेटवण्याची तयारी जोरात आहे. यासाठी भाजप नेतृत्वाने तयारी केली आहे. काँग्रेस किंव्हा जेडीएस चे आमदार फोडता आले नाहीत तर वेगवेगळी आंदोलने पेटवून सरकार खिळखिळे करण्याची तयारी भाजप सारखे पक्ष करत आहेत. यासाठी आंदोलकांना पाठबळ देण्यासाठी बरेच आमदार, खासदार व भाजप नेते अधिवेशनात कमी आणि रस्त्यावर जास्त दिसणार आहेत.
आंदोलने करण्यासाठी सरकारने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी कर्नाटकातील माध्यमे जास्त असतील त्यामुळे अधिवेषनापेक्षा जास्त चर्चा आंदोलनांची कशी होईल याची मॅनेजमेंट आतापासून सुरू झाले आहे.
सरकार प्रश्न सोडवून आपण नायकत्व स्वीकारणार की हतबल होणार हे सुद्धा मुख्यमंत्री कुमारस्वामी तसेच इतर काँग्रेस जेडीएस नेत्यांच्या कार्यकुशलतेवर ठरणार आहे.