भाजपचे विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध वाढू लागला आहे शुक्रवारी सायंकाळी ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे.
जुन्या पुणे बंगळुरू रोड वर अलारवाड क्रॉस येथे सोमवारी भाजपच्या वतीने शेतकरी आंदोलन होणार आहे या आंदोलन स्थळी पेंडाल भूमीपूजनावेळी हा प्रकार घडला आहे.
ग्रामीण मंडळ अध्यक्ष नेमणुकीत इतर इच्छुक असताना केवळ आपला भाऊ आपल्या समर्थकाचीच का वर्णी लावली असा प्रश्न उपस्थित करत अभय अवलक्की युवराज जाधव आणि भाजप कार्यकर्त्यानी खासदारांना जाब विचारला त्यावर खासदारानी “होय मी नियुक्ती केलीये तुम्हाला पक्षात काम करायचं असेल तर करा अन्यथा पक्ष सोडून जा” अशी भूमिका घेतल्याने हा वाद जोरातच चिघळला होता.शेवटी संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील भाजपच्या इतर नेते मंडळी समोर देखील याची तक्रार केली आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सध्या खासदार जोरात चर्चेत आहेत गेल्या पंधरा वर्षात आपल्या कामाची विशेष अशी छाप न पाडल्याने अंगडी यांना जनतेतून रोष पत्करावा लागतच आहे त्यातच स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील विरोध करत त्यांना घरचा आहेर दिला आहे त्यामुळं त्यांचे टेन्शन वाढले आहे.
खासदारांना जाब विचारत असतेवेळी भाजप कार्यकर्ते अंगडी हटाव भाजप बचाओ अशी घोषणा देत होते त्यामुळं आगामी निवडणुकीत जर का उमेदवारी मिळाली तर अंगडी यांना जनते बरोबर स्वकीयांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.