वडगावच्या शूरवीर निखिल दयानंद जितुरी या तरुणाला राज्य सरकारने शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या बालकाचा जीव निखिलने वाचवला होता.
आज बंगळूर येथील कब्बन पार्क येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
१० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१३ एप्रिल ला याचवर्षी एक बालक वडगाव येथील एक विहिरीत पडले होते. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न अपयशी झाल्यानंतर निखिल कडे त्याला बाहेर काढण्याची जबाबदारी आली होती.
निखिल ने आपला जीव धोक्यात घालून या बालकाला वाचवले होते. त्याच्या या धाडसाचे कौतुक बेळगाव live ने सर्वप्रथम केले होते. आता त्याला राज्य पातळीवर सन्मान मिळाला आहे.
सर्वप्रथम बेळगाव live ने निखिलची शौर्यगाथा जगा समोर मांडली होती त्याला राज्य पुरस्कार मिळावा अशी मागणी देखील केली होती.