बेळगावच्या गजाननराव भातकांडे स्कुलच्या कामाची दखल घेऊन ब्रिटिश कौन्सिलने उत्कृष्टता पुरस्कार नुकताच दिला. ही माहिती कळल्यावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शाळेच्या या प्रगतीचे कौतुक केले आहे.
ब्रिटिश कौन्सिल चा हा मानाचा पुरस्कार घेणारी ही एकमेव शाळा असल्याचे समजताच कौतुक व अभिनंदन करून शैक्षणिक क्षेत्रात या शाळेचे कार्य वृद्धिंगत होवो अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या पुरस्काराची माहिती दिली होती. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात ही चर्चा झाली.
त्यावेळी उच्च शिक्षण मंत्री जी टी देवेगौडा, तरुण कार्यकर्ते जयराज हलगेकर, भातकांडे स्कुल च्या प्राचार्या दया शहापुरकर, चिटणीस मधुरा भातकांडे, स्वप्नील वाके, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.