गजाननराव भातकांडे स्कूलला प्रतिष्ठेचा ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे हा मानाचा पुरस्कार मिळवणारी गजाननराव भातकांडे हायस्कूल ही उत्तर कर्नाटकातील एकमेव शाळा आहे ‘अशी माहिती गजाननराव भातकांडे स्कूलच्या मुख्याध्यापिका दया शहापुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भातकांडे स्कूलचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. ब्रिटिश् कौन्सिल ही शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून गेल्या 70 वर्षांपासून भारतात कार्यरत आहे .या कौन्सिलच्या कार्याबाबत भातकांडे शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने अनेक महिने अभ्यास केला आणि त्यानंतर कौन्सिल कडे अर्ज केला. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देता येईल यासाठी शाळेच्या प्राचार्या दया शहापूरकर समन्वयक स्वप्निल वाके आणि संस्थेच्या सचिव मधुरा भातकांडे यांनी चेन्नई व बेंगलोर येथे विशेष प्रशिक्षण घेतले त्यानंतर ब्रिटिश कौन्सिलच्या मार्ग सूचीनुसार शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले त्यानंतरच अभ्यास करून हा पुरस्कार दिला आहे अशी माहिती भातकांडे यांनी दिली.
या अंतर्गत शाळेमध्ये विविध फुलांचे प्रदर्शन, बियांपासून वृक्षाची निर्मिती, विविध विमानतळे, रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणांना भेट देऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दळणवळणाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली . वेगवेगळ्या नाट्य स्पर्धा भरवण्यात आल्या, सहलीच्या माध्यमातून काश्मीर, कुलु मनाली, उटी यासारख्या थंड हवेचे ठिकानाबरोबरच गड आणि किल्ले यांच्या भेटी, बचतीचे धडे देण्यासाठी शाळेत सोलार प्रकल्प राबविण्यात आले, आंतरराष्ट्रीय शाळांमधील विद्यार्थ्यांची व्हिडिओकॉनफ्रेन्सद्वारा संवाद साधण्यात आला ज्यामध्ये बांगलादेशच्या इलम डी बॉईज कुलचा यूनिस खान, केनियाच्या गर्ल्स सेकंडरी स्कूल ची सेंट क्लेअर ,इजिप्तच्या अब्दुल फते स्कूलची सोहेल जाकी यांच्याशी संवाद साधला.
शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी पाचशे पानांचा अहवाल तयार करून ब्रिटिश कौन्सिलला पाठविण्यात आला. या सर्व गोष्टींची दखल घेऊन ब्रिटिश कौन्सिलने गजाननराव भातकांडे स्कूल ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल केला आहे असे प्राचार्यांनी सांगितले.गेल्या चार डिसेंबर रोजी हॉटेल ताज बेंगलोर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ब्रिटीश कौन्सिल कडे अर्ज केलेल्या चारशे शाळांपैकी अडीचशे शाळांना या पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार मिळवणारी भातखंडे स्कूल ही या भागातील पहिली इंग्रजी शाळा होय
. या पुरस्कारामुळे शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास वाव मिळाला असून शिक्षकांना उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त झाले
या पत्रकार परिषदेप्रसंगी संस्थेच्या चिटणीस मधुरा भातकांडे , समन्वयक स्वप्निल वाके आणि काही शिक्षक वर्ग उपस्थित होते