Friday, January 24, 2025

/

अधिवेशनाच्या नावावर पोलिसांची दादागिरी

 belgaum

दुकाने बंद करून परत जाणारे, दुकानातील कामगार, कामावरून परत चालत किंव्हा मोटारसायकलवरून जाणारे नागरिक, बस साठी उभे असलेले नागरिक अशा सगळ्यांवर रोज रात्री दहा नंतर पोलिसांची दादागिरी सुरू आहे. रात्री १० नंतर रस्त्यावरून जाणेसुद्धा अवघड झाले असून नागरिकांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. सर्व व्यवहार बंद चा फतवा आणि अधिवेशनाच्या नावाखाली शहर भागत पोलिसांची दादागिरी सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी बेळगाव शहराच्या काही भागात दगडफेक व इतर घटना घडल्या. या घटना पाहून अधिवेशन काळात काही चुकीच्या घटना घडू नव्हेत म्हणून शहरातील सर्व व्यवहार रात्री १० नंतर बंद करण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी काढला. या आदेशाचा मान राखून सर्व व्यवहार ९.३० ते १० यावेळेत बंद केले जात आहेत पण काम संपवून घरी जाताना नागरिकांना पोलिसांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.

Police round night
रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला जात असून नागरिक पोलिसांच्या दहशतीच्या छायेत आहेत. या पोलिसांना नागरिकांना लाठी मारून हाकला असा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे काय असे प्रश्न लोकांना पडत असून असे झाल्यास सामान्य नागरिक अधिवेशन होईपर्यंत घरात बसण्याची वेळ आली आहे.

टवाळखोर, नशेबाज आणि रात्रभर रस्त्याशेजारी थांबणारे यांना हाकलले तर ठीक आहे पण खरेदी, दवाखाने किंव्हा इतर कामे करून परतणाऱ्यांवर पोलिसांनी दादागिरी सुरू केली आहे.

अधिवेशनामुळे दिवसाच्या वेळी ट्रॅफिक जाम असते यामुळे लोक संध्याकाळी कामास बाहेर पडतात. अनेकजण रात्रीच्या पाळीवर काम संपवून घरी जात असतात. कोण आहे याचा विचार सुद्धा न करता गुरा ढोरां सारखे मारणे हे पोलिसांनी बंद करावे अशी मागणी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.