अधिवेशन सुरू आहे आणि बंगळूर येथील मंत्री, आमदार व अधिकारी मोठ्या प्रमाणात बेळगावला आले आहेत. दिवसा अधिवेशनातील बेचव जेवण जेवून कंटाळले जाणारे हे लोक रात्रीच्यावेळी शहरात फेरफटका मारून फेमस मटणाच्या खानावळीत जात आहेत.
बेळगावचे मटण ताट सगळीकडे प्रसिद्ध आहे. बेळगावमध्ये मटण खाण्याची लज्जत मोठी आहे यामुळे येथील खानावळींमध्ये बंगळूर चे लोक गर्दी करत आहेत.
सध्या चुलीवरच्या मटण हा महिला आघाडीचा ब्रँड जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवत आहे. याचबरोबर चौगुले मेस,यशवंत,सयाजी व इतर ठिकाणीही गर्दी होत आहेत.
बंगळूर वरून येणारी माणसे खास करून बेळगावच्या मांसाहारी खाण्यावर भर देत आहेत.
सायंकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत गर्दी राहत असून त्यात पोलिसांचीही समावेश आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पोलिसांना बेळगावचे झणझणीत जेवण प्रेमात पाडू लागले आहे