हशीश या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोषी म्हणून सिद्ध झाल्यानंतर आकाश देसाई सहित चौघांना आज शिक्षेची घोषणा झाली आहे. दहा वर्षे कैद आणि प्रत्येकी चार लाख दंड ठोठावण्यात आला आहे.
आकाश भालचंद्र देसाई( वय ३४ रा बोळमल बोळ, शहापूर), आसिफ अब्दूलमूनाफ बुरानवाले( वय ३५ रा. मठ गल्ली, होसुर), मुन्ना उर्फ महमदअली सय्यद(वय २७, रा. पेठ, रायगड), संजय नरसिंग हरवळकर ( वय ३५, रा. बारदेश गोवा) हे चौघे या प्रकरणात आहेत.
दुसरे अतिरिक्त सत्र न्यायालयात याबद्दल सुनावणी झाली असून दोष निश्चित करण्यात आले होते. शिक्षा सूनवण्याची प्रक्रिया सोमवारी झाली आहे. मागील ११ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.