निवडणुकीत राबायला मराठा हवा म्हणून कदम यांच्या गळ्यात माळ घातली जात आहे असे स्पष्ट आरोप भाजप मधील एका मराठा नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
गेली अडीच वर्षे भाजप ग्रामीण अध्यक्षपद खासदार सुरेश अंगडी यांनी आपले भाऊ मोहन अंगडी यांच्याकडे ठेवलं होतं त्यामुळे केवळ सहा महिन्याच्या अवधीसाठी लोक सभा निवडणूक आली म्हणून विनय कदम सारख्या मराठा समाजाच्या युवकाला केवळ राबवून घेण्यासाठी हे पद दिल जात आहे असें त्यांनी सुनावलं आहे.
लोकसभा निवडणुकीत बेळगाव तालुक्यात मते मागायला अंगडी यांना मराठा माणूस हवा,इतर वेळी पद देतेवेळी कुटुंबीय चालतो मात्र तालुक्यात फिरण्यासाठी लोकसभेची मते मागण्यासाठी मराठा माणूस म्हणूनच विनय कदम यांच्या नियुक्तीसाठी खासदार जोरदार प्रयत्नशील आहेत असेही ग्रामीण भाजपच्या नेत्याने म्हटलं आहे. विनय कदम यांची ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे भाजपासाठी योगदान दिल्याने दुसऱ्यांदा त्यांची निवड झालीय.
कुणाही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता निवड केल्यानेच संतप्त कार्यकर्त्यांनी काल अलारवाड क्रॉस जवळ खासदार अंगडी यांना जाब विचारला होता.विनय कदम यांच्या नियुक्तीवर कुणालाच आक्षेप नाही मात्र सर्वांना विश्वासात घेऊन का निवड झाली नाही असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी अंगडी यांना केला होता.
खासदारा सोबत झालेल्या वादा नंतर ग्रामीण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांनाच काळी निशान दाखवून विरोध करू असा इशारा दिला होता मात्र माजी मंत्री लक्ष्मण सवदी आदींनी हस्तक्षेप करत दोन दिवसा नंतर बेळगावचा विषय संपवू असे आश्वासन देताच तूर्तास मवाळ झाला आहे.
एकूणच लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार अंगडी यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे जस जशी निवडणूक जवळ येईल तसा तो वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.