Friday, December 27, 2024

/

एपीएमसीत आता रताळी पोत्यातून ओतून दर

 belgaum

एपीएमसी मध्ये मागील काही दिवसांपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये सुरू असलेली चढाओढ यामुळे साऱ्यांचीच गोची झाली होती. मात्र शुक्रवारी याबाबत व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत यापुढे समोरच माल ओतावा आणि दर निश्चित करावा असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता काही व्यापाऱ्यांनी याची सुरुवात केली आहे.

Apmc strike

शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या निर्णयाची शनिवारी तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे एपीएमसी मधील बऱ्याच व्यापाऱ्यांनी यासाठी विशेष जाग्याची सोय करून रताळी व बटाटा त्याजागी ओतला जाऊ लागला आहे. त्यामुळे बाहेरील व्यापारीही या मालाकडे वळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसापासून शेतकरी मुळी माल पोत्याच्या मध्यभागी भरून व्यापाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र व्यापारी आणि शेतकरी वर्गाची बैठक घेण्यात आली आणि यावर तोडगा काढण्यात आला. मात्र परत काही शेतकऱ्यांनी किडका व मुळीचा माल पोत्यात घालण्याचे काम सुरू करण्यात आल्याने व्यापारी वर्गाने याला विरोध करून पुन्हा बैठक घेतली आणि कोणाचाही माल असो तो ओतूनच त्याचा लिलाव करावा, असे ठरवण्यात आले आहे.

शनिवारी बाजारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रताळी आणि बटाटा मालाची आवक वाढली आहे. यातच आता शेतकरी आणि बाहेरील व्यापाऱ्यांसमोर हा माल ओतून विक्रीही करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता थेट आणि चांगला हमीभाव देण्याची जबाबदारीही वाढल्याचे दिसून येत आहे. यापुढे आता अशा प्रकारेच लिलाव होणार की आणखी काही यामध्ये बदल होणार ते येत्या काही दिवसातच समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.