Friday, December 27, 2024

/

प्रशासकीय लवादाचे काम होणार सुरू

 belgaum

कर्नाटक राज्य प्रशासकीय लवादाचे काम येत्या १७ डिसेंबर पासून बेळगावमध्ये सुरू होणार आहे. या लवादाचे चेअरमन जस्टीस के भक्तवत्सला यांनी ही घोषणा केली असून उपलब्द कर्मचारी घेऊन लवाद सुरू केला जाणार आहे.
१३ ऑगस्ट २०१५ रोजी राज्य सरकारने बेळगाव साठी हा लवाद मंजूर केला आहे पण अद्याप कामकाज सुरू झालेले नव्हते ते आता लवकरात लवकर सुरू होऊ शकेल.

अद्याप या लवादाचे कामकाज चालवण्यासाठी स्वतंत्र इमारत सुद्धा मिळालेली नाही. यासाठी लीज तत्वावर मार्च २०१७ पासून इमारती भाड्याने घेण्यात आल्या असून तेथे कामकाज सुरू केले जाणार आहे.
सरकारी नोकर, तक्रारदार आणि वकील या साऱ्यांच्याच बाबतीत हे सोयीचे होऊ शकणार आहे. सध्या नेमणुका, बदल्या, निवृत्ती, फायदे आणि बढती बद्दलचे सर्व सरकारी नोकरांचे तक्रार अर्ज विचारात घेऊन त्यावर बंगळूर येथेच कामकाज चालत होते आता बेळगावला सुद्धा याची सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.