बेळगाव कडून कोल्हापूर कडे जाणाऱ्या दुचाकीने पाठीमागून ऊस वाहू ट्रॉलीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर सायंकाळी पाचच्या सुमारास कोगनोळी जवळ घडली आहे. वडील आणि मुलगीचा मृत्यू या अपघातात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूब राजेसाब नदाफ 32 वय येळ्ळूर त्यांची मुलगीकुलसन मेहबूब नदाफ वय 12 येळ्ळूर मयतांची नावे असून नदाफ हे येळ्ळूर हुन आपल्या नातेवाईकांच्या घरी चापगाव कोल्हापूर येथे जात होते त्यावेळी हा अपघात घडला आहे. कोगनोळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उसवाहू ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक MH 09, AL 8533 या वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटून दुचाकीचालक ट्रॅक्टरच्या मागील चाकात शिरला तर दुचाकीच्या मागील आसनावर बसलेल्या मुलीच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यावर हायवेवर बराच काळ ट्राफिक जाम झाला होता निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रहदारी अडचण दूर केली. मयत नदाफ हे परमेश्वर नगर येळ्ळूर येथील रहिवाशी असून ते गादी बनवण्याचे काम करत होते.निपाणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.