रोटरी क्लब ऑफ बेळगाव या १९४१ साली स्थापन झालेल्या जुन्या सामाजिक संस्थेतर्फे उद्या रविवार दि ३० रोजी रस्ते सुरक्षा आणि रहदारी जागृती मोहीम आयोजित केली आहे.कित्तूर चन्नम्मा सर्कल आणि कोल्हापूर सर्कल येथे ही मोहीम होणार आहे.
के एल ई सिबाल्क कॉलेजचे ५० रोट्रॅक्टर्स आणि रोटरी बेळगावचे सदस्य तसेच जैन कॉलेजचे रोट्रॅक्टर्स या मोहिमेत सहभागी होतील.प्रत्येक वाहनचालकास रस्ता सुरक्षितता आणि रहदारी नियम यांची माहिती दिली जाणार आहे.
भारतात वाहन अपघातात अनेक मृत्यू होतात. जागतिक बँकेच्या आकडेवारी नुसार भारतात २०१६ या वर्षात १.५१ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत.हेल्मेटचा वापर आणि कारमध्ये सीट बेल्ट लावणे हे उपाय मृत्यू टाळू शकतात
याची माहिती पत्रके आणि स्टिकर्स च्या द्वारे नागरिकांना दिली जाणार आहे. आत्ता पर्यंत २५०० मोटारसायकल स्वारांना याची माहिती देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्त सुरक्षित प्रवासाबद्दल जागृती करण्याचा हेतू आहे. मध्यपान करून वाहन चालवू नका असा संदेशही देण्यात येणार आहे.
२०१९ यावर्षात असे अनेक उपक्रम ठेऊन जागृती केली जाईल अशी माहिती अध्यक्ष डॉ मुकुंद उडचणकर यांनी दिली