रविवारी कोवाड (महाराष्ट्र) येथे झालेल्या धर्मांतरण प्रकरणी तलवार हल्ला आणि कर्नाटक सीमेवर झालेल्या वाहनांच्या मोडतोड प्रकरणी पोलिसांनी बेळगावात तपास सुरू केला आहे.
35 युवकांच्या एका गटाने महाराष्ट्रातील कोवाड गावातील प्रार्थनागृहांवर हल्ला केला होता. महाराष्ट्र पोलिसांना हल्लेखोर हे बेळगाव मधीलच असल्याचा संशय आहे त्यामुळे बेळगाव स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पकडण्यासाठी येथे मदत मागितली आहे त्यानंतर तपास मोहीम देखील सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोवाड येथील हल्यात 10 जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले होते नंतर ते त्यांच्या बाईकवरून गायब झाले. यात सुमारे 10 ते 12 बाइक होत्या आणि प्रत्येक बाईकवर तीनजण सवार होते. सर्व बाइकच्या नंबर प्लेट काढण्यात आल्या होत्या याचा अर्थ हा हल्ला पूर्व-नियोजनबद्ध होता अशीही माहिती पोलिसां कडे उपलब्ध झाली आहे.
कोवाड गावातील गावकऱ्यांनी हल्यानंतर बाइकवरील हल्लेखोर कर्नाटक मधील तालुक्यातील आगसगा गावात गेले. त्यांच्या त्या मार्गावर, ऑटो रिक्षा आणि एक कार फोडली. जेव्हा काही गावक-यांनी या हल्लेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोल्हापूर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोवाड गावात जाऊन गावातील सदस्यांशी सोमवारी या घटनेविषयी चर्चा केली. महाराष्ट्र पोलिसांनी मदतीसाठी कर्नाटक पोलिसेशी संपर्क साधला आहे म्हणून बेळगाव पोलिसांनी देखील या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.दरम्यान बेळगाव पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित शहर परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केलं आहे.