बेळगाव मध्ये दोन आठवड्याचे भरलेले कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे. उत्तर कर्नाटक विकास नाही आणि बाकीची काहीच विकास योजना नाही अशा वातावरणात करोडो रुपयांचा खर्च करून कर्नाटक सरकार परत जाणार असून पुन्हा येरे माज्या असे म्हणत उत्तर कर्नाटकातील लोकांना दिवस काढावे लागतील.
मुख्यमंत्री कुमारस्वामी आपली छाप पाडू शकले नाहीत.
काँग्रेस आणि जेडीएस असे संयुक्त सरकार असले तरी काँग्रेस मधील नाराज गटाला खुश करण्यात अपयश आले त्यामुळे अधिवेशनात जास्त जादू दाखवता आलेली नाही.
पहिल्या दिवसापासून झालेली आंदोलने आणि त्या आंदोलनांनी पेटवलेले राजकारण यामुळे अधिवेशनात नवीन असे काय झाले नाही.
मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री असलेले भाजप नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एडीयुराप्पा यांच्यातील वाद इतकाच स्टंट सोडला तर अधिवेशन फक्त कुचकामी ठरले आहे.
मंत्री आमदार व अधिकाऱ्यांना वर्षातून एकदा बेळगावला येऊन ट्रिप काढण्याची संधी आणि त्यासाठी सरकारी खर्च एवढेच अधिवेशन ठरत असून आता या अधिवेशनाचे काय केले नाही याची चर्चा होणार आहे.