पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट केंद्रात चांगला नागरी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आता येथे दररोज १०० अर्जदारांना बोलावून त्यांचे अर्ज मार्गी लावण्याची सोय करण्यात आली आहे. पूर्वी ही संख्या ५० वर मर्यादित होती.
पूर्वी ऑनलाईन अर्ज केल्यावर २० दिवसांनी बोलावणे येत होते पण आता संख्या वाढल्याने १ ते २ दिवसात बोलावणे येऊ लागले आहे.
याठिकाणी पासपोर्ट अर्ज पडताळणी करून पासपोर्ट मिळण्याची सर्व सोय मिळत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घेण्याची गरज आहे.