कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप वेगवेगळे प्रयत्न करत आहे. १० रोजी सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनादिवशी राज्यभरातील १ लाख शेतकरी सुवर्ण विधानसौध वर धडकणार आहेत. भाजप रयत मोर्चा च्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री बी एस एडीयुराप्पा या आंदोलनाचे प्रमुख असतील.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले या प्रमुख मुद्द्यावर हे आंदोलन होणार आहे. दुष्काळ काळात शेतकऱ्यांना भरपाई देण्यात सुद्धा सरकारला अपयश आल्याचे कारण या आंदोलनात पुढे केले जाणार आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या भाजपच्या आणि एडीयुराप्पा यांच्या भूमिकेला टोला हाणला आहे. एडीयुराप्पा हे आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जागे झाले काय? असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंद होण्याची शक्यता आहे. विधानसौध जवळ या आंदोलनास स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.