Saturday, January 18, 2025

/

दरोडा,वाटमारीच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक

 belgaum

दरोडा,वाटमारीच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक
दोन तलवारी, एक स्टंप आणि एक कंट्री पिस्तुल जप्त
शहापूर पोलिसांची कारवाई

आज सकाळी वडगाव स्मशानजवळ शहापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. दरोडा आणि वाटमारीच्या प्रयत्नात राहून बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा त्यांच्यावर घालण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन तलवारी, एक क्रिकेटची स्टंप आणि एक कंट्री पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

Shahapur ps

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप उर्फ सँडी प्रकाश जाधव ( वय ३१)रा. भारतनगर, शहापूर यांच्याकडे १ कंट्री पिस्तुल सापडले आहे. दर्शन नारायण पाटील( वय २३) रा. भारतनगर, शहापूर याच्या हातात स्टंप होती.महेश परशराम मेलगे( वय २१) रा. अवचार हट्टी याच्या हातात एक तलवार होती , रवी यशवन्त पाटील ( वय २८) रा. येळ्ळूर रोड, वडगाव यांच्याही हातात एक तलवार सापडली असून त्यांच्यासोबत महादेव पुंडलिक तुळजाई ( वय २१)रा. विठलाई गल्ली अवचारहट्टी व मारुती कल्लाप्पा बिरादार ( वय २३) रा. मारुती गल्ली, मुतगा हे दोघेही होते.

वडगाव स्मशानभूमी जवळ हे सर्वजण लूटमार करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यावरून धाड घालून तपास करता अंगामध्ये लपवलेली हत्यारे सापडली आहेत. यामुळे त्यांचा उद्देश स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

एकाद्या ठिकाणी दरोडा घालणे किंव्हा रस्त्याने ये जा करणाऱ्यांना अडवून त्यांना धमकावून लुटणे अशा प्रयत्नात हे सहाजण होते.
शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी, सीसीबीचे निरीक्षक बी एस गुदीगोप्प आणि पीएसआय बी के नदाफ यांनी ही कारवाई केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.