शाळांतून विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलेला बूट घोटाळ्याची चौकशीची मागणी सदस्य रमेश गोरल यांनी केली तर सावंगाव मधील तलावात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अश्या घटना टाळण्यासाठी म्हणून सर्व तलावाना चारी बाजूनी तारेचे कुंपण घालण्याची मागणी बेळगुंदी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली.बेळगाव तालुक्यातील या दोन्ही सदस्यांनी आजच्या जिल्हा पंचायतीच्या बैठकीत महत्वाचे मुद्दे मांडले.
जिल्ह्यात शिक्षण खात्याकडून शाळांना वितरित झालेल्या घोटाळ्याचा विषय जिल्हा पंचायत आरोग्य शिक्षण स्थायी समितिचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी सभागृहात मांडला त्यावेळी प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली.शिक्षण खात्याने नियुक्त केलेल्या बूट पुरवठादारानी नियम मोडत वितरण केले आहे एकदम निकृष्ट दर्जाचे बूट वितरण केल्याने केवळ महिन्या भराच्या आताचं हे बूट खराब झाले आहेत याची चौकशी करा अशी मागणी गोरल यांनी केली त्यावर सी इ ओ रामचंद्रन यांनी सदस्यांनी चौकशी करा अश्या सूचना दिल्या मात्र गोरल यांनी चौकशी सदस्यांनी केली तरी कारवाई अधिकाऱ्यांनी करायला हवी अशी मागणी केल्यावर रामचंद्रन यांनी भ्रष्टाचाराचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
बेळगाव ग्रामीण भागात रस्त्यांची चाळण-मोहन मोरे
सावगाव येथे तलावात बुडून चार शाळकरी विद्यार्थी बुडून मयत झालेत अश्या घटना रोखण्यासाठी जिल्हा पंचायतीने मोहीम राबवून सर्व तलावात जन जागृती फलक बसवावे आणि तलावांच्या चारी बाजूनी तारेचे कुंपण घाला अशी मागणी केली त्यावर यावर एक्शन प्लॅन बनवू असे आश्वासन मिळाले.
गेल्या वर्षात तलावात बुडून 15 विद्यार्थी दगावले आहेत प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी तलावात उडी घेणाऱ्या विद्यार्थ्यांत समुपदेशन करावे ज्यामुळे मुलांत जागृती होईल शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.बेळगाव ग्रामीण मतदार संघात रस्त्यांची चाळन झाली असून बेळगुंदी जिल्हा पंचायत क्षेत्रातील रस्त्यांकडे लक्ष द्या अशीही मागणी त्यांनी केली.