युवा समितीने 29 नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्याची हाक दिली आहे त्या साठी त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री,सीमासमन्वयक मंत्री, विरोधी पक्षनेते,शिवसेना पक्ष प्रमुख , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवसेना गटनेते या सर्वांना याची कल्पना देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
मागील काही वर्षापासून उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही ती तातडीने घ्यावी, खटल्याला गती मिळावी, तसेच सीमासमन्वयक मंत्र्यांनी सुद्धा बेळगावकडे दुर्लक्ष केले आहे पण यापुढे त्यांनी किमान महिन्यातून एकदा बेळगाव दौरा करावा आणि येथील समस्या जाणून घ्याव्यात तसेच
गेल्या काही वर्ष्यापासून प्रश्न कोर्टात असून देखील कर्नाटक सरकारची भाषिक सक्ती आणि दडपशाही वाढली आहे म्हणून त्यात महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन सिमवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत महाराष्ट्र मधील सर्वपक्षीय आमदार खासदार यांनी सीमाप्रश्न सोडवनिकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी.
सीमाभागातील हुतात्म्यांच्या वारसदारांना 100℅ वाढीव पेन्शन द्यावी आदी मागण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.अश्या विविध मागण्यांसाठी म्हणून 29 नोव्हेंबर 2018 रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युवकांनी नावे नोंदणी करण्याचे आवाहन
दिनांक २९/११/२०१९ रोजी मूंबई मधील आझाद मैदानावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ज्या कार्यकर्त्याना यायचे आहे त्यांनी आपापली नाव, पत्ता आणि आपला संपर्क क्रमांक आणि आपले आधार कार्ड खालील नंबर पाठवून आपली नावे बुधवार दिनांक २१/१०/२०१८ पर्यंत नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीकांत
:+919611756529
साईनाथ
:7411872442