पुण्यातील नामवंत संस्था फ्रीडम फ्रॉम डायबिटीस त्यांचा मधुमेह मुक्तीचा बेसिक प्रोग्राम घेऊन बेळगावात येत आहेत. मधुमेही आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर, पहिला क्रॉस येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांनी एक असा अद्वितीय कार्यक्रम विकसित केला आहे कि, ज्यामध्ये आहार, व्यायाम, आंतरिक परिवर्तन आणि वैद्यकीय या चार प्रकारचे प्रोटोकॉल आहेत जे अनेक वर्ष संशोधन आणि कठोर परिश्रम घेऊन अस्तित्वात आणले आहेत. ह्या प्रोटोकॉल्सच्या मदतीने फ्रीडम फ्रॉम डायबेटिस ने 5000 हुन अधिक लोकांचे मधुमेहच्या गोळ्या बंद केल्या आहेत, तर 1000 हुन अधिक लोकांचा इन्सुलिन बंद केला आहे. 2030 पर्यंत भारतीय मधुमेहींची संख्या 1 करोड च्या खाली आणण्याचे डॉक्टर त्रिपाठींचे ध्येय आहे.
14 नोव्हेंबर 2018, जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी, फ्रीडम फ्रॉम डायबेटिस चा महत्वपूर्ण रिसर्च पेपर, इंटरनॅशनल जर्नल ऑफ डाइबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजी ने प्रकाशित केला आहे, ज्याच्यात विशेषतः वनस्पतींवर आधारित आहारविषयक बदल आणि अँटी-ग्रॅव्हिटी व्यायाम याविषयी माहिती दिली गेली आहे.
याच्या सहाय्याने , 73% लोक इन्सुलिन पासून मुक्त झालेले आहेत, 68% लोक गोळ्या आणि इन्सुलिन पासून मुक्त झालेले आहेत, 38% लोक गोळ्यां पासून मुक्त झालेले आहेत तर 80% लोकांचे HBa1C पूर्णपणे नियंत्रणात आलेले आहे.
ही संस्था लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते आणि लोकांचा मधुमेह पूर्णपणे उलटवून टाकण्यास मदत करते. या संस्थेचे यावरील संशोधन, नवकल्पना, वैद्यकीय मदत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आज फ्रीडम फ्रॉम डायबेटिस जगप्रसिद्ध झाले आहे. फ्रीडम फ्रॉम डायबेटिस ची प्रमुख शाखा पुणे मध्ये असून ते भारतातील 10 पेक्षा अधिक शहरांमध्ये त्यांनी एक अशी डॉक्टर ची टीम बनवली आहे जी सर्वांच्या सेवेत उपस्थित असते.एवढेच नाही तर आता फ्रीडम फ्रॉम डायबेटिस ची डॉक्टरांची टीम वाढत चालली असून , या संस्थेचे तेच स्वप्न आहे की ते अशीच अनेकांची मदत करतील, आणि एके दिवशी डायबेटिस फ्री भारताचे निर्माण करतील.
आज डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सर्वांगीण आरोग्य आणि तणावमुक्ती या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. स्वतः एक चिरतरुण आणि आनंदी व्यक्तिमत्त्व, आणि सकारात्मक जीवनाचे उदाहरण असणार्या डॉक्टर त्रिपाठी यांचे ध्येय हेच आहे की इतरांनाही असेच चिरतरूण आयुष्य जगण्यासाठी मदत व्हावी.फ्रीडम फ्रॉम डायबेटिस आपला बेसिक प्रोग्रॅम बेळगाव येथे रामनाथ मंगल क्रियालय, भाग्यानगर आणि हुबळी येथे हेब्सुर भवन, ग्रीन गार्डन जवळ, गोकुल रोड आयोजित करीत आहेत. ह्या प्रोग्रॅम मध्ये आपल्यास डायबेटिस रिव्हर्स कसा होतो ह्याची पूर्ण माहिती दिली जाणार आहे.
कोणत्याही चौकशीसाठी आपण 7776077760 वर आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपण https://www.freedomfromdiabetes.org/ नोंदणीसाठी क्लिक करु शकता.