राज्यात महत्वाचा प्रदेश समजल्या जाणाऱ्या उत्तर कर्नाटकातील पोलीस खात्याचे बेळगाव रेंज म्हणजे उत्तर विभाग पोलीस महा निरीक्षक(आय जी पी)हे पद गेल्या दोन महिन्यापासून रिक्तच आहे.
तात्कालीन आय जी पी अलोक कुमार यांची बदली होऊन दोन महिने उलटले तरी राज्य सरकारने अद्याप या जागेवर दुसऱ्या आय जी पी ची नियुक्ती केली नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यावर पहिल्यांदा 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौरा केला होता त्याच दिवशी सुवर्ण सौध मध्ये जनता दर्शन कार्यक्रम घेतला होता त्या दिवशी नंतर त्यांनी आय जी पी अलोक कुमार यांची बंगळुरू ला बदली केली होती त्या नंतर उत्तर विभाग बेळगाव रेंज चे आय जी पद रिक्तच असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
अलोक कुमार यांनी आपल्या दीड वर्षाच्या कालावधीत आय जी रेंज बऱ्याच अवैध धंद्यावर नियंत्रण आणले होते वाळू माफिया,भीमा तीरावर गुंडगिरी ला आळा घातला होता मात्र त्यांची बदली झाल्याने अवैध धंदे पुन्हा वाढले आहेत. अलोक कुमार अनेक अवैध धंद्यावर नियंत्रण आणले होते हेच त्यांच्या तडकाफडकी बदलीचे मुख्य कारण होत असं जाणकारांचे मत आहे. उत्तर कर्नाटकातील बडी राजकीय नेते मंडळीचा आशिर्वाद वाळू तस्करावर आहे त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली हेच बदली मागचे कारण आहे अशी देखील माहिती समोर येत आहे.
एकूणच उत्तर विभाग आय जी पदी कुणाची नियुक्ती होते हे पहावे लागेल मात्र सदर नियुक्ती लवकर झाली पाहिजे उत्तर कर्नाटकात बेळगावात आगामी 5 डिसेंम्बर पासून सुवर्ण सौध मध्ये अधिवेशन होत आहे त्यासाठी आय जी रिक्त पद भरावे लागणार आहे.