कोकणी भाषिक वेगवेगळ्या जाती धर्मात विभागले गेलेत त्यांना एकत्रित आणण्यासाठी उजवाड स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे उदगार गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.ते कोंकणी महोत्सव उदघाटन केल्यावर बोलत होते.
उझवाड या कोकणी मासिकाचा वर्धापन दिन कोकणी लोकोत्सव या माध्यमातून आज उत्साहात साजरा झाला. बेळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातील कोकणी बांधव एकत्र जमले होते.
सेंट झेवीयर्स हायस्कुल च्या पटांगणात हा कार्यक्रम झाला. गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे प्रमुख उपस्थितीत होते.
खासदार सुरेश अंगडी, कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी चे अध्यक्ष आर पी नाईक, आमदार अनिल बेनके व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ डेव्हिड अल्वारेस मुंबई,महाड चे जॉन्सन डिसोझा,बिडी खानापूरचे फ्रांसिंस्को सेराव, कोल्हापूरचे सांप्रास बारदेस्कर,महेश वेरणेकर बेळगाव,चंदगड चे संतन डिसोझा या व्यक्तींना कोंकणी अभिमान आणि कोंकणी गौरव हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.