एक रस्ता जो बेळगाव शहर आणि तालुक्याच्या हद्दीत आहे अनेक लोकप्रनिधींच्या अखत्यारीत येतो मात्र तो केला जात नाही त्यामुळं या बाबतीत लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे.बेळगाव ए पी एम सी ते हंदीगनूर पर्यंतच्या रस्त्या बाबत असे म्हणावे लागते आहे.
हा रस्ता ए पी एम सी ते मार्कंडेय नगर पर्यंत उत्तरआमदार अनिल बेनके, मार्कंडेय नगर ते कंग्राळी नदी पर्यंत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर ,कंग्राळी नदी ते हंदीगनूर क्रॉस यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात येतो.ए पी एम सी ते अलतगा क्रॉस पर्यंत बेळगावचे खासदार सुरेश अंगडी तर अलतगा क्रॉस ते हंदीगनूर पर्यंत चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हद्दीत येतो तीन आमदार दोन खासदारांच्या सह गेली तीन वर्षे झाली पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना अनेकदा निवेदने देण्यात आली आहे.
राज्यात मोठी जिल्हा पंचायत असलेल्या जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष दररोज दोन चार वेळा याच रस्त्यातून प्रवास करतात अनेक नगरसेवक तालुका पंचायत ग्राम पंचायत आणि जिल्हा पंचायत सदस्य याच रस्त्यावरून ये जा करतात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय लोक प्रतिनिधींचा वावर असताना रस्ता दुरुस्त होत नाही याचं कारण काय? ही लोकशाही की हुकूमशाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.वास्तविक हा रस्ता सर्वात मोठी बाजार पेठ ए पी एम सी जोडलेला आहे,हायवेला जोडणारा पंचवीस ते तीस गावांचा संपर्क रस्ता आहे मात्र याकडे दुर्लक्ष झालेलं आहे.
कंग्राळी रस्त्यासाठी मागील अनेक महिन्यापासून आंदोलन आणि निवेदने देण्यात आली. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता तीन आमदार, दोन खासदार आणि स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असलेली बेळगावं महा पालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र अजूनही हा रस्ता अर्धवट राहिला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी आता मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन त्यांनीच रस्ता करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एपीएमसी ते हंदीगनुर क्रॉस पर्यंत चा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे. त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी केवळ जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनीच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना घेऊन अनेकवेळा आंदोलन व मोर्चे काढले आहेत. त्यामुळे आमदार आणि खासदार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हा रस्ता कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.गेल्या बारा वर्षा पूर्वी समितीच्या आमदाराच्या कारकीर्दीत हा रस्ता झाला होता त्या नंतर एक इंचही डांबर या रस्त्यावर घालण्यात आला नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे जनता रस्ता रोको करणार आहे.
कंग्राळी खुर्द या गावातील ज्योतिनगर इतर भागातील काही प्रभाग महा पालिकेत येतात महापालिका स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट आहे तर कंग्राळी गाव स्मार्ट व्हिलेज योजनेत आहे असं असताना स्मार्ट सिटीचा निधी कामा अभावी शिल्लक स्मार्ट व्हिलेज योजनेचा फंड उपलब्ध आहेच मात्र पी डब्ल्यू डी अधिकारी निधी नसल्याची माहिती देत आहेत तीन वर्षां पासून हे काम प्रलंबित आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक प्रतिनिधिंचा संपर्क असलेल्या या रस्त्याचं भाग्य उजळणार की कंग्राळी खुर्द ग्रामस्थांना पून्हा आंदोलन करावं लागतंय हे पहावे लागेल.