केदनुर ता बेळगाव येथे मंगळवारी चोरट्यानि धुमाकूळ घातला आहे. तीन मंदिरातील दागिने आणि ऐवज लांबून चोरटे पसार झाले आहेत. या चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केदनुर येथील श्री महलक्षमी मंदिरात चोरट्याने कडी कोयंडा तोडून अडीच लाख रुपये चोरी केली आहे. हे मंदिर गावच्या मध्ये असून ही चोरी करत असताना आजूबाजूला असलेल्या नागरिकांना याची भानकाही लागली नाही यामुळे चोर हे चोरीत तरबेज असल्याचे दिसून येत आहे.
श्री महालक्षमी मंदिरात चोरी करून हाळवी मंदिराकडे चोरट्याने मोर्चा वळवला त्या मंदिरातही चोरी करून याच गावातील आणखी एका मंदिरात चोरी करण्यात आली आहे. यामुळे याच गावातील तीन मंदिरामध्ये तब्बल 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मागील अनेक महिन्यापासून चोरट्यानि आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविलताचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा विचार करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे