प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी आराम बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी तर अकरा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली आहे.
प्रसाद के वय 40 रा. बंगळुरू असे या घटनेत ठार झालेल्या बस चालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर गार्डन जवळ हायवेवर हा अपघात घडला असून सदर बस मैसूरू हुन मुंबईकडे जात होतीरहदारी उत्तर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
रहदारी उत्तर विभाग पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी बेळगाव live दिलेल्या माहितीनुसार सिमेंटचे कॉलम वाहून नेणाऱ्या ट्रक ला मुंबईकडे जाणाऱ्या एस आर एस बसने मागून जोराची धडक दिली यात ट्रकचे पूर्ण नुकसान झाले आहे.
बस चा समोर भाग निकामी झाला आहे या घटनेत बस चालक घटनास्थळीच ठार झाला असून बस वाहक गंभीर जखमी झाला आहे .किरकोळ जखमी आणि गंभीर जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.