टिपू सुलतान जयंतीच्या तोंडावर समर्थन आणि विरोध ही लढाई सोशल मीडियावर सुरू करून नसता गोंधळ घालणाऱ्या एक तरुणास सी ई एन पोलिसांनी अटक केली आहे. यापुढे फेसबुक वर बदनामी करणाऱ्यांनी सावध राहावे लागेल.
भा द वि १५३ ए व ६६, आय टी कायदा २००० नुसार जेड गल्ली शहापूर येथील अजय उर्फ अक्षय विजय सावंत( वय ३२) याला अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
राज्य सरकार आणि विरोधी पक्षात टिपू जयंती वरून संघर्ष सुरू होता त्यात अनेक युवकांनी टिपू सुलतान वरून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याचा ठपका ठेवला आहे गुन्हा नोंद केला आहे.