‘वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता रजेवर असणे आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांला प्रभारी पदाचे पदभार दिल्या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक अडचणीत आले आहेत.जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन यांनी त्यांना कारणें दाखवा नोटीस बजावली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हा दक्षिणचे जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक हे 15 ते 24 नोव्हेंबर पर्यंत रजेवर गेले आहेत रजेवर जातेवेळी त्यांनी आपल्या जिल्हा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उप शिक्षणाधिकारी एम आर अलास यांना सोपवून रजेवर गेले होते.
दुसऱ्या अधिकाऱ्यांला प्रभार पद देण्यापूर्वी तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतला काय?असा प्रश्न नोटिस
मध्ये विचारण्यात आला आहे. जिल्हा स्तरीय अश्या जबाबदारीच्या पदावर असताना देखील तुमचे कर्तव्य बजावत असतेवेळी दुर्लक्ष झाले असे वरील कृतीत दिसून आले आहे असं देखील नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. म्हणून राज्य सरकार नागरी सेवा कायदा 1966 प्रकारे तुमच्या विरुद्ध बेशिस्त पणाची शिफारस का केली जाऊ नये असं देखील नोटिशीत म्हटलं आहे.
या नोटिसचे लिखित रुपात उत्तर देणे गरजेचे आहे त्यामुळे रजेवर जाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय प्रभार पद देणे हे ए बी पुंडलिक यांच्या अंगलट आले आहे.जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्रन राव यांनी नोटीस बजावली आहे.