संपूर्ण वार्डात कचरा साचलाय मॅडम जरा कचरा काढायला लावा असे सांगायला गेलेल्या नागरिकांना उद्धट उत्तर देणाऱ्या नगरसेविकेच्या घरासमोर नाराज नागरिकांनी कचरा नेऊन टाकला आहे. काल रात्री घडलेल्या या घटनेची जोरात चर्चा आहे.
काही नागरिक शास्त्रीनगर भागातील त्या नगरसेविकेच्या घरी गेले होते. नगरसेविका झाल्यापासून आपण फक्त नाम मात्र राहून सगळा कारभार पती आणि उनाड मुलांच्या हातात दिलेल्या त्या नगरसेविकीला नागरिकांच्या त्रासाचे कायच सोयर सुतक नव्हते.
नागरिकांनी कचऱ्याची समस्या सांगितली तरी उद्धट उत्तर देण्यापेक्षा दुसरा काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
या कारणाने नागरिक चिडले आणि त्यांनी कचरा नेऊन टाकला. या घटनेने त्या नगरसेविकेच्या मुलाने चिडून काही लोकांना धक्काबुक्की केली आहे. या घटनेची शहरात जोरात चर्चा सुरू आहे. नगरसेविका तिच्या मुलांच्या उपद्व्यापाने बदनाम होत आहे. तर पती काम करण्याशिवाय सेटलमेंट करण्यात जास्त वेळ घालत असल्याने नाराज नागरिक भडकत आहेत.
बेळगाव महा पालिकेला स्वच्छतेत पुरस्कार मिळाल्याची घोषणा होऊन एक दिवस देखील झाला नसताना स्वच्छते वरून असले प्रकार घडत आहेत.,