घराचा कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघा युवकांना शहापूर पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्या जवळील चोरी केलेला माल जप्त केला आहे.शंकर जंतीकट्टी वय 21 रा.पाचवा क्रॉस भारतनगर खासबाग आणि मंजुनाथ कळळीमनी वय 22 रा.गणेशपेठ गल्ली जुने बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
बुधवारी आरोपी दोघेही जुने बेळगाव परिसरात संशयास्पद रित्या पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले आहे.21ऑक्टोबर रोजी शिवलीला सुनदोळी यांच्या घराचा कुलूप तोडून त्यांनी चोरी केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.पोलिसांनी दोघा युवकांकडून दोन सोन्याच्या लहान चैन,एक कानातील रिंग असा 30 हजारांचा माल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या आदेशानुसार शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी आणि सहकाऱ्यांनी हे चोरी प्रकरण केवळ 24 दिवसात सोडवलं आहे.या प्रकरणी शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.