छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना आणी गड उभारताना किती त्रास घेतले याची माहिती शाळकरी जीवनातच विद्यार्थ्यांना करून दिले तर महत्वाचे असते. यासाठीच बेळगावच्या बालिका आदर्श शाळेने आपल्या शाळेतील मुलींना प्रतापगडाची सहल घडवून दिली आहे.
शाळेतील मुलींना शिवरायांच्या प्रतापगडावर नेऊन त्या काळात किल्ले बांधण्याची पद्धत , किल्ल्यावरील राहणीमान, शिवरायांनी याच किल्ल्यावरून स्वराज्यासाठी केलेले पराक्रम याची माहिती देण्यात आली.
फक्त चित्रकला किल्ला बघण्यापेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन अनुभव देण्यात आला असून शिवकालीन इतिहासाची आठवण या निमित्त केली आहे.
शाळांनी गडकोट आणि किल्ल्यांची सहल आयोजित करून इतिहासाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे असा आदर्शच या शाळेने घालून दिला आहे.