बेळगावचे पोलीस आयुक्त कार्यालय आणि पोलीस हेडक्वार्टर म्हणजे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती होती. पण आता हे चित्र बदलत आहे. संपूर्ण आयुक्तालय आणि हेडक्वार्टर ला आता तारेचे कुंपण तर काही ठिकाणी कंपाऊंड घातले जात आहे. व्यक्तींच्या मुक्त प्रवाशांवर यापुढे निर्बन्ध येणार आहेत.
हे तारेचे कुंपण आरटीओ सर्कल ते पोलीस प्रमुख कार्यालय, तिथून शिवाजी नगर आतला मार्ग व कृषी कार्यालय व आतील भाग असे पूर्ण असेल. फक्त दोन ठिकाणी प्रवेशद्वार असणार असून तेथे ये जा करणाऱ्यांची नोंद ठेवण्यात येणार आहे.
तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. बाहेरून वाहने किंव्हा व्यक्ती येत असल्यास कुणाकडे आणि का याची माहिती द्यावी लागणार आहे.अनेक गैरप्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.