सोमवारी सकाळी पासून पांगुळ गल्लीतील मास्टर प्लॅन सुरू होणार होते मात्र केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने पालिकेच्या वतीनं अधिकृतपणे मास्टर प्लॅन सुरू झाले नसले तरी व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन आपापल्या मालमत्ता हटवण्यास सुरू केल्या आहेत त्यामुळं मास्टर प्लॅन सुरुवात झाली आहे.
रविवारी रात्री पासूनच या गल्लीतील व्यापारी व नागरिकांनी 30 फूट रुंदीकरणाचे मार्किंग करण्यात आले आहे ते हटवण्यास सुरुवात केली होती सोमवारी सायंकाळ पर्यंत या गल्लीतील लोकांनी स्वतः होऊन 80 टक्के हुन अधिक अतिक्रमण हटवले आहे.
अनंतकुमार यांच्या निधनामुळे सुट्टी असल्याने पालिका अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी गल्लीत आले नाही मात्र व्यापारी व रहिवाशानी स्वतःहून मास्टरप्लॅन सुरू केला त्यामुळे महापालिकेचे काम सोपे झाले. काही व्यापाऱ्यांनी 2015 सालचा न्यायालयाचा स्थगिती आदेश आस्थापनांसमोर प्रदर्शित केल्यामुळे मास्टरप्लॅनला विरोध होणार का? अशी शंका उपस्थित झाली होती. पण गल्लीतील व्यापाऱ्यांनी एक दिवस आधीच जंप्स हटविण्यास सुरूवात केली होती.रविवारी रात्री गल्लीतील जैन मंदीर परीसरातील व्यापाऱ्यांनी जंप्स हटविण्यास सुरूवात केल्यानंतर अन्य व्यापाऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले होते. त्याआधी माजी नगरसेवक रायमन वाझ व गल्लीतील काही नागरीकांनी व्यावसायीकांची भेट घेवून मास्टरप्लॅनला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पांगूळ गल्लीतील रस्ता 30 फूट रूंद होणार आहे. त्यासाठी दिवाळीच्या आधी मार्किंग करण्यात आले होते पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर पंच मंडळी, नागरिक व व्यापारी यांची बैठक झाली होती. बैठकीत 30 फूट रूंदीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती.