सर्पाचा मोर्चा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी वळला आहे. त्यामुळे सर्प मित्रांची चांगलीच कसरत झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य अधिकारी असलेल्या महनीयांच्या घरी सर्प आढळून लागले आहेत.
एकजुकेटीव्ह इंजिनिअर यांच्या निवासस्थानी 2 धामण सर्प आढळून आले असून ते पकडण्यासाठी सर्प मित्र चिट्टी यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी ते सर्प पकडले असून त्यांना सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांच्या निवासस्थानी 1 धामण,जिल्हा उपवनसंरक्षक यांच्यां निवास स्थानी नाग, तर बुडा कमिशनर प्रीतम नसलापूरे यांच्या निवास स्थानी धामण असे सर्प आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसापासून सापांनी आपला मोर्चा प्रशासकीय अधिकारी यांच्या घरी वळविल्याचे दिसून येत आहे.शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या निवासस्थानी धामण जातीच्या सर्पाने प्रवेश केला यावेळी सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी यांनी तो सर्प पकडला. त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी सोडून दिले आहे.
हे सर्प नोव्हेंबर मध्येच का बाहेर पडतात? कारण
हिमसुप्ती नंतर ऊन शोषण करण्यासाठी नोव्हेंबर मध्ये ऊन घेण्यासाठी विशेषतः धामण साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे ते पोलीस प्रमुख्याच्या कर्मचाऱ्यांना ते दृष्टीस पडले असावेत. विश्वेश्वरय्या नगर या परिसरात प्रशासकीय अधिकारी आहेत आणि याच परिसरात धामण सापाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे दर वर्षी असे प्रकार घडत असतात.
धामण सर्पापासून धोका नाही तो आपल्याजवळ असल्यास उंदीर खाऊन दुसऱ्या विषारी सापापासून आपले रक्षण करू शकतो. पण कर्मचाऱ्याना व महिला वर्गाच्या भीतीसाठी हे साप पकडावे लागतात.अशी माहिती चिट्टी यांनी दिली.