बेळगाव शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक हा आंदोलने मोर्चे निदर्शन करण्याचा चौक म्हणून प्रसिद्ध आहे मात्र बेळगाव शहर महानगरपालिकेने आज एक महत्वाचा ठराव केला आहे.यापुढे कित्तूर चन्नाम्मा चौकात कुणालाही टायर, कुणाच्याही प्रतिमा आणि फटाके फोडण्यास यापुढे बंदी असणार आहे.
शनिवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत हा ठराव पास करण्यात आला आहे. टायर जाळल्याने आणि फटाके फोडल्याने चन्नम्मा पुतळ्याचा रंग कमी होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा ठराव करण्यात आला आहे.
हा चौक म्हणजे बेळगाव शहरातील प्रमुख चौक असून येते निदर्शने आणि आंदोलने होतात. या चौकात स्वातंत्र्य लढ्यातील वीर राष्ट्र पुरुषाच्या पुतळ्या समोर हे प्रकार होत असल्याने सध्या येथील आंदोलने बंद करा अशी मागणी वाढत आहे.
(File photo: belgaum rani kittur channma chouk protest tyre burnt)
पहिले पाऊल उचलत पालिकेने हा निर्णय घेतला आहे. वाजपेयी रस्त्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे आणि अनगोळ च्या संभाजी चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे हे ठराव सुद्धा करण्यात आले आहेत. सभागृहाने जिना बकुळ बॉक्साईट रोड वरील चौकास महर्षी वाल्मिकी चौक असे आणि अनेक उपनगर आणि रस्त्यांना स्वातंत्र्य योध्याची नावे देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
सकाळी बैठकीत विश्वासात न घेता विषय पत्रिका तयार केल्याचा आरोप करत मराठी नगरसेवकांनी सभात्याग केला होता त्याचा फायदा घेऊन सत्ताधारी पक्षाने ऐकून18 पैकी सात विषय मंजूर करून घेतले आहेत.महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी आवाज मतदानासह कोरम पूर्ण करून घेऊन ठराव संमत करून घेतलेत.