कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र आणि बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी रोहित चव्हाण याने सुवर्ण पदक पटकावले आहे.केरळ येथील कालिकत युनिव्हर्सिटीत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 90 किलो वरील वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले आहे.
रोहित चव्हाण यानें राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी कडून सहभाग दर्शवला होता त्याला त्याचे शिक्षक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.ही स्पर्धा 17 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान कालीकत केरळ मध्ये झाली होती.देशातील विविध भागातील 250 युनिव्हर्सिटी चे 300 हुन अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता.
रोहित हा ए पी एम सी बॉक्सइट रोड वरील ओलांपिया जिम मध्ये सराव करत असतो.कालीकत मधून देश पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे कंग्राळी खुर्द गावात त्याच जल्लोषी स्वागत करण्यात आलं.यावेळी समिती नेते आर आय पाटील यांनी रोहितचे गावात स्वागत केलं.गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्याला युनिव्हर्सिटी ब्लु हा किताब चन्नम्मा युनिव्हर्सिटी कडून देण्यात आला त्यानंतर कालीकत येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.टीम बेळगाव live कडून रोहितचे अभिनंदन