मुंबई विरुद्ध कर्नाटक 4 बाद 257 के.व्ही.सिध्दार्थचे नाबाद शतक,शिवम दुबेचे 4 बळी
बेळगाव येथील केएससीए स्टेडीयमवर आजपासुन सुरु झालेल्या मुंबई विरुद्ध कर्नाटक रणजी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्नाटक संघाने 4 गडी गमावून 257 धावा केल्या.धडाकेबाज फलंदाज के.व्ही.सिध्दार्थ याचे नाबाद शतक आणी भेदक गोलंदाज शिवम दुबे यांचे 4 बळी आजच्या खेळाचे वैशिष्ट्य होते.
नाणेफेक जिंकून कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.अवघ्या 16 धावसंखेवर सलामीचा फलंदाज शिशीर भावाने बाद झाला.त्यांनतर डी.निस्चल व कुनियंन आबास यानी संघाची धाव संख्या अर्धशतकापार नेली.मात्र 27 धावा काढून निस्चल पायचीत झाला.यावेळी संघाची धावसंख्या 2 बाद 82 होती.
सिध्दार्थ आणी कुनियंन यानी सयमी खेळी करत संघाची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला.64 धावा काढून कुनियंन बाद झाला.त्यांनतर आलेल्या स्तुअर्ट बिनीने निराशा केली.अवघ्या 10 धावा काढून बिनी बाद झाला.
बिनी बाद झाल्यावर कर्णधार श्रेयस गोपाल याने सिध्दार्थच्या सह संघाची धावसंख्या दोनशेवर नेली.यावेळी सिध्दार्थने शतकं झळकाऊन सर्वांची दाद मिळविली.दिवस अखेर सिध्दार्थ 12 चौकारांसह 104 तर गोपाल 8चौकारांसह 47 धावा काढून नाबाद राहीले. मुंबईचा वेगवान गोलंदाज शिवम दुबे याने 32 धावा देत 4 गडी बाद केले.
न्यूज अपडेट सौजन्य-श्रीकांत काकतीकर बेळगाव