सीमा भागासह मुंबईत देखील काळा दिवस पाळण्यात आला समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या एवजी दुसरा समनव्यक मंत्री नेमा अशी मागणी करण्यात आली. सीमा संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत देखील काळा दिन पाळण्यात आला.
गुरुवारी सकाळी 9:30 वाजता करी रोड नाका येथे सर्व सीमाबांधव व कोल्हापूरकर बांधवांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखऊन काळादिन पाळला.निपाणी बेळगाव बिदर सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषनेनी सर्व परिसर दणाणुन गेला.बेळगावात कर्नाटक सरकारकडून सतत होणारा न्याय .मात्र हे महाराष्ट्र सरकार बघ्याची भुमीका घेत आहे असा आरोप करण्यात आला
महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सीमाभागावर स्वतंत्र बेळगावात जाऊन मराठी भाषकांची विचारपूस करणारे समन्वयक मंत्री नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रींना घेऊन ताबडतोब सीमाप्रश्न निकालात काढावा.यावेळी सीमा संघर्ष समन्वय समिती व
मराठी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील राज्यकर्ते मग ते काँग्रेस, भाजपा वा शिवसेना असाे ह्याना मराठी भाषिक वर्गाचे हितसंबंध सांभाळण्यात कवडीचीपण इच्छा कधीही नव्हती. मराठी भाषिक वर्गाने लक्ष्मीची उपासना केल्यास ह्या थिल्लर राज्यकर्त्यांचे पाय पकडावे लागणार नाही.