केंद्रीय खत मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सर्व शाळा व कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे.कर्नाटक राज्य शिक्षण खात्याने हा सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे सोमवारी शहरा सह राज्यातील सर्व शाळा कॉलेज सरकारी कार्यालयाना सुट्टी असणार आहे.
अनंतकुमार हे ५९ वयाचे होते. केंद्रात असलेले कर्नाटकाचे एक प्रभावी नेते ही त्यांची ओळख होती.
भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे सोमवारी पहाटे 1 वाजून 50 मिनिटांनी बंगळुरू येथे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अनंतकुमार यांना कर्करोगाचे निदान झाले होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत दिवेसंदिवस खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
अनंतकुमार हे कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते अमेरिकेत उपचारासाठी गेले होते. 20 ऑक्टोबर रोजी ते हिंदुस्थानात परतले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेली. उपचारांना त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने परिस्थिती आणखी बिघडली.
अनंतकुमार दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रतिनिधीत्व करत होते. 1996 पासून ते सहा वेळा या मतदार संघातून निवडून आले होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात 2014 पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता. तर जुलै 2016 पासून त्यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.