दहा डिसेंम्बर रोजी बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनास चोख प्रत्त्युत्तर म्हणून मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.शनिवारी दुपारी मराठा मंदिरात या बैठकीचे आयोजन केले त्याच्या अध्यक्ष स्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी होते.
बेळगाव शहरावर आपला हक्क दाखवण्यासठी कर्नाटक सरकारने सुवर्ण विधान सौध बांधलं असून दरवर्षी या सुवर्ण सौध मध्ये आशिवेशनाचा घाट घातला जातो ज्या ज्या वेळी अधिवेशन त्या त्यावेळी मेळाव्याने चोळ प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे म्हणून आगामी अधिवेशनास देखील मेळावा घेऊन विरोध करण्याचे ठरवण्यात आले. लवकरच याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात येणार आहे.
युवा समितीच्या वतीने आगामी 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला या बैठकीत पाठिंबा व्यक्त करण्यात आला समितीच्या ध्येय धोरणा नुसार युवकांनी आंदोलन हाती घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
1 नोव्हेंबर काळ्या दिनी पोलिसांकडुन झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला सुरुवातीला समितीच्या मयत झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी समितीची नेते मंडळी उपस्थित होती.