Wednesday, December 4, 2024

/

‘डिसेंबर मध्ये जेष्ठ वकीलांशी चर्चा’

 belgaum

सुप्रीम कोर्टात मागील अनेक महिन्यापासून सीमाप्रश्नी तारीख देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना चिंता लागून राहिली आहे याचा विचार करून लवकरच जेष्ठ वकिलांशी बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.

कोल्हापूर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्यावेळी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Sharad pawar ncp

कोल्हापूर येथे शरद पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जेष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दिल्लीत येणार आहेत त्यावेळी वकील शिवाजी पाटील आदींची भेट घेऊन लवकरच सीमाप्रश्नी कारवाई सुरू करण्याचा विचार व्यक्त करू असे सांगितले. दिल्लीत जेष्ठ वकिलां सोबत होणाऱ्या बैठकीत तुम्ही सहभागी व्हा अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मागील ६३ वर्षांपासून सीमाभागातील जनता लोकशाही आणि न्याय मार्गाने लढत आहे. मात्र कर्नाटक सरकार सातत्याने अन्याय आणि अत्याचार करत आहे. त्यामुळे जेष्ठ वकिलांशी चर्चा करून येथील अन्याय व अत्याचार आणि सीमाप्रश्नी होणार विलंब यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लवकरच दिल्ली येथे वकीलांशी बैठक घेण्याचे ठरविले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.