सोमवार पासून पांगुळ गल्लीत मास्टर प्लॅन मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.,शहराची व्होलसेल बाजार पेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांगुळ गल्लीचे 30 फूट रस्ता रुंदीकरण होणार आहे.
गेल्या दोन आठवड्या पूर्वी 30 फूट रुंदीकरण मार्किंग करण्यात आले होते मात्र दिवाळी सण आल्यामूळ ती मोहीम पुढे ढकलण्यात आलो होती व्यापाऱ्यांना 30 फूट दुकाने अतिक्रमण काढून घ्यायला अवधी दिला होता त्या नंतर सोमवारी सकाळी पासून हे काम हाती घेतले जाणार आहे.
पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी सोमवारी पासून पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.तात्कालिक पालिका आयुक्त एस रविकुमार यांनी शहरातील अनेक ठिकाणची मास्टर प्लॅन मोहीम हाती घेतली होती मात्र त्यांची बदली झाल्या नंतर ही मोहीम थंडावली होती मात्र आता कुरेर यांनी पांगुळ गल्ली रुंदीकरण करण्यात पुढाकार घेतला असून सोमवारी सकाळ नंतर मोहीम सुरू करा तश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.