लग्नाच्या तयारीचे वेध सुरू झाले आहेत. यंदा 12 डिसेंम्बर पासून लग्नच्या मुहूर्ताना सुरुवात होणार आहे. इच्छुकांनी आता बाशिंग बांधुन घेण्याची धडपड सुरू केली आहे.
यंदा लग्नाचे 83 मुहूर्त असून जुलै 2019 प्रयत्न लग्नाची धामधूम चालणार आहे. लग्नाचा बार उडविण्यासाठी अनेक वधू आणि वर पक्षातील मंडळी सज्ज झाली आहे. काहीजण नातेवाईकाकडून सोयरिकी जुळवण्याची तयारीही करत आहेत.
यावर्षी गुरूचा अस्त असल्याने तुळशी विवाहानंतर 22 दिवस मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे. ज्यांचा विवाह निश्चित झाला आहे त्यांनी लग्न पत्रिका, वाजत्री, मंडप, आचारी, आदी खरेदी वर भर दिला आहे. 12 डिसेंम्बर ते 11 जुलैपर्यंत मुहूर्त असून अनेकजन तयारीला लागले आहेत.
डिसेंम्बरमध्ये 12, 13, 17, 18, 22, 26, 28,
जानेवारी 2019 मध्ये 2, 18, 19, 23, 25, 26, 27, 28, 29, फेब्रुवारी महिन्यात 1, 8, 9, 10, 11, 15, 19, 21, 22, 24, 26, मार्च मध्ये 2, 3, 8, 9 ,10, 13, 14, 19, 22, 25, 27, 29, 30, 31,
एप्रिल महिन्यात 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 26, 27, 28, मे मध्ये 7, 8, 12, 14, 15, 17, 19, 21, 23, 26, 29, 30, 31, जून 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 25, 26, 28,
जुलै महिन्यात 6, 10 व 11 तारखेला मुहूर्त आहेत.