गांधीनगर मधील समितीचा युवा कार्यकर्ता सूरज कणबरकर याने सीमाभागात मराठीचा अपमान होत असल्याची तक्रार भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे केली आहे.
आम्ही सीमाभागात १५ टक्के पेक्षा अधिक आहोत पण आमच्या भाषेचा मान राखला जात नाही. कन्नडची सक्ती केली जाते याकडे लक्ष द्या आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने नेमून दिलेले अधिकार व हक्क आम्हाला द्या असे त्याने निवेदनात लिहिले आहे.
नुकतेच एक चहा दुकान सुरू करताना असा प्रकार घडला आहे. महानगरपालिकेकडून मराठी फलक लिहिण्यास बंदी घालण्यात आली होती. असे करणारे मनपा आयुक्त व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करा ही मागणी केली आहे.
बसचे फलक, कागदपत्रे व इतर माहिती मराठीतून द्या असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही अन्याय सुरू आहे. आयोगाने आमचे हक्क मिळवून द्यावेत अशी मागणी केली आहे.