मागील दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात बिबट्यांची दहशत वाढली आहे. जिकडे तिकडे बिबट्याचीच चर्चा सुरू आहे. अजूनतरी माणसाला या बिबट्याने कोणतीच हाणी केली नाही. मात्र याची धास्ती साऱ्यांनीच घेतल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी कलखांब येथील सिलेंडर फॅक्टरीच्या वरील जंगल भागात बिबट्या दिसला होता. त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनखात्याच्या अधिकारण्यांना याची माहिती देण्यात आली होती. याचबरोबर आमदार सतीश जारकीहोळी यांनीही या भागाची पाहणी केली आहे.
यावेळी सतीश जारकीहोळी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आपणही वाखात्याला याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे काळजी करू नये आणि धीराने राहावे असे आवाहन केले आहे. लवकरात लवकर बिबट्याला पकडू, असे आश्वासन देखील त्यांनी दिलय.
कलखांब,अष्टे चंदगड आदी भागात त्यांनी भेट दिली. आमदार सतीश जारकीहोळी साहेबांनी भेट देऊन अरण्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून लवकरात लवकर बिबट्याला पकडा अशी सुचना केली. आणी तसेच या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याची सुचना सुद्धा केली.